नौदल सप्ताह २०-२३ च्या अनुषंगाने 22 रोजी नौदलाच्या वतीने मलवणात आरोग्य शिबिर

ग्रामीण रुग्णालय मालवण येथे दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी विविध रोग निदान शिबीर नौदलातर्फे व जिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात या शिबिरात मेडिसिन ,सर्जरी ,नाक कान घसा,डोळे विकार, दंतविकार, लहान मुलांचे विकार,त्वचा विकार, स्त्री रोग समस्या व विकार इत्यादी आजारांवर नौदलाच्या मुंबई येथील अश्विनी हॉस्पिटल मधील नौदलाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी,रोग निदान व उपचार करण्यात येणार आहेत.

तपासणी अंती निवडलेल्या शस्त्रक्रिया पात्र रुग्णांना शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या शिबिरामध्ये खालील नौदलाचे तज्ञ डॉक्टर रुग्णसेवा देणार आहेत
डॉक्टर एम डी ईद्रिस यांच्या नेतृत्वाखाली
डॉक्टर अरुण हेमेटॉलॉजिस्ट
डॉक्टर प्रवीण पाटील, एमडी मेडिसिन
डॉक्टर संतान कुमार सर्जन
डॉ ए बी सिंग,नाक कान घसा तज्ञ
डॉ कौशिक घोष डोळे विकार तज्ञ
डॉक्टर चंद्रकांत राणा
डॉक्टर जे बी दयाळ त्वचारोग तज्ञ
डॉक्टर सुरज बालरोग तज्ञ डॉक्टर ओंकार वनवे सर्जन डॉक्टर रणजीत साहू व डॉक्टर दीपक बिशीट दंत चिकित्सक व इतर तज्ञ डॉक्टर आरोग्य सेवा देणार आहेत
यावेळी आभा कार्ड,PMJAY… प्रधानमन्त्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन e कार्ड काढणे त येतील ,अवयव दान प्रतिज्ञा व जनजागृती करणेत येईल.शिबिरातील मोतीबिंदू झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार आहे .
तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन मा.जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील ,डॉ सुबोध इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी,डॉ सई धुरी जिल्हा आरोग्य अधिकारी,तहसीलदार मालवण सौ. वर्षा झालटे ,नायब तहसीलदार मालवण श्री गंगाराम कोकरे,वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी व सर्व ग्रामीण रुग्णालय स्टाफ व तालुका आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य विभागमालवण यांचे मार्फत करण्यात येत आहे..

मालवण (प्रतिनिधी)

error: Content is protected !!