तळागाळातील सर्वसामान्यासाठी सेवा देणारे व्यक्तमत्व म्हणजे महेश इंगळे!

पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांचे प्रतिपादन

वाढदिवसानिमीत्त स्वामीभक्त व नागरिकांकडून महेश इंगळेंचा सत्कार

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी
अक्कलकोट शहर व तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व स्वामी भक्त तसेच वटवृक्ष मंदिर विश्वस्त समिती तसेच कर्मचारी व सेवेकरी यांच्या वतीने देवस्थानच्या अतिथी कक्षात महेश इंगळे यांचा वाढदिवस शाल, पुष्पगुच्छ देवून, केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महेश इंगळेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी महेश इंगळे यांचे व्यक्तीमत्व अत्यंत विनम्र स्वभावाचं, धार्मिक नेतृत्वाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय नेतृत्वाची कास सांभाळत चालणारी आहे. त्यांची ही सेवा तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळेच त्यांचा मित्र परिवार अक्कलकोट पुरता मर्यादित न राहता परदेशात देखील त्यांचा भक्त व मित्र परिवार आहे. यापुढील त्यांचे कार्य स्वामी समर्थांची सेवा करण्यामध्ये व अक्कलकोटला एक मध्यवर्ती पर्यटन केंद्र निर्माण करण्यामध्ये व्यतीत होवो असे मनोगत व्यक्त करून महेश इंगळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज महेश इंगळेंच्या
या वाढदिवसानिमीत्त तालुक्याचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी मा. आमदार सिध्दाराम म्हेत्रे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व विश्वस्त मंडळ, मुंबई महावितरणचे पीआरओ मिलिंद अवताडे, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर गृह शाखेचे नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, अक्कलकोट शरणमठाचे विश्वस्त
बसवराज अलमद,कोळी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी,
मा.आमदार शिवशरण पाटील, नगरसेवक तथा अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, रईस टिनवाला, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, संतोष पराणे मित्र परिवार, कै. कल्याणराव इंगळे महाविद्यालयाच्या वतीने प्रा नागनाथ जेऊरे व स्टाफ आदीसह शहरातील आजी माजी नगरसेवक, शहरातील जगदंब प्रतिष्ठान, शक्तिदेवी प्रतिष्ठान, आझाद गल्ली मित्र मंडळ, बेडर गल्ली मित्र मंडळ, स्विमिंग ग्रुप, संतोष पराणे मित्र मंडळ, कै. उमेश इंगळे मित्र मंडळ, पत्रकार संघ, नाभिक समाज संघटना, नाईकवाडी गल्ली मित्र मंडळ, कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, तसेच शहरातील व्यापारी शिवपुत्र हळगोदे, प्रसाद पाटील सर, शिवशरण अचलेर, संतोष फुटाणे, चंद्रकांत सोनटक्के, ईरण्णा पाटील, अविनाश मडीखांबे, खाजप्पा झंपले मित्र मंडळ, अब्दूल शेख, अमर पाटील, गंगाधर मोरे, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, बंडेराव घाटगे, अब्दुल शेख, ज्ञानेश्वर भोसले, रवि मलवे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, संतोष जमगे, प्रकाश सुरवसे, बिराजदार सर, जगताप सर, योगेश पवार, कराडचे स्वामीभक्त प्रशांत शिंदे, राजेंद्र वाचकवडे, सोनाली वाचकवडे, शुभांगी जगताप, सुनीता वाचकवडे, संतोष जाधव, प्रसाद पाटील सर, डॉ.शिवराया आडवितोटे, राजू नवले, मंगेश जाधव, योगेश लोकापूरे, प्रा.विजयकुमार लिंबीतोटे, आदींनी महेश इंगळेंचा शाल, पुष्पगुच्छ मिठाई देवून केक कापून सत्कार केला. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी समाजातील सर्वांनीच आपल्यावरील व्यक्त केलेल्या प्रेमामुळे आपणा सर्वांचे ऋणी असून या पुढेही आपणा सर्वांचे स्नेह असेच कायम रहावे असे मानस व्यक्त केले.

मसुरे | झुंजार पेडणेकर

error: Content is protected !!