लक्ष्मण साबाजी पवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 2023 विजय चौकेकर आणि अनिल चव्हाण यांना

पुरस्कार वितरण 26 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ विधीज्ञ विलास परब आणि गुरुवर्य के एम पताडे यांच्या हस्ते
विज्ञाननिष्ठ पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून “सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवली” यांच्यातर्फे दिला जाणारा लक्ष्मण साबाजी पवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 2023 सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर, मालवण आणि अनिल चव्हाण, घोणसरी पिंपळवाडी यांना घोषित करत आहोत.
सदर पुरस्कार दोघे करत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यासाठी दिला जाणार आहे. रोख पाच हजार रुपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कार सदाशिव पवार गुरुजी यांच्या मातोश्री सरस्वती लक्ष्मण पवार यांच्या स्मृतिदिनी 26 नोव्हेंबर रोजी प्रदान केला जाईल. यावेळी सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार ,”तेजस बांदिवडेकर, वजराट *” यांना प्रदान केला जाईल आणि *मंगेश चव्हाण, आकाश चव्हाण, सचिन चव्हाण , हरकुळ खुर्द यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात येईल.
शुभांगी पवार
सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवली.





