गिरणी कामगारांनी म्हाडाच्या घरासाठीच्या शिल्लक पोच पावत्या न्याव्यात – भाई चव्हाण

कणकवली:- गिरणी कामगारांनी घरांसाठीे म्हाडामध्ये बॅकांच्या माध्यमांतून भरलेल्या अर्जांच्या २२५ पोच पावत्या अद्यापही आमच्याकडे शिल्लक राहिल्या आहेत. सद्या म्हाडाने ऑनलाईन अर्ज छाननी मोहिम सुरू केली आहे. पुराव्यांची कागदपत्रे अर्जांमध्ये दाखल करताना या पोच पावत्या असणे आवश्यक आहे. तरी जिल्यातील अशा गिरणी कामगारांनी या पोच पावत्या आमच्याकडून ओळखीच्या पुराव्यानिशी घेऊन जाव्यात, अशी सूचना गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे कोकण विभागीय संघटक गणपत तथा भाई चव्हाण यांनी केली आहे.
सन २०११ आणि २०१२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हातील गिरणी कामगारांनी घरांसाठी ॲक्सिस आणि सारस्वत बॅंकांच्या माध्यमातून म्हाडाकडे ६२०० अर्जं भरले होते. त्या अर्जांपैकी सुमारे २२५ पोच पावत्या आमच्याकडे अजुनही शिल्लक आहेत. विशेष म्हणजे ही छाननी मोहिम सुरू झाल्यानंतर दिवंगत कामगार नेते दिनकर म्हसकर यांच्या कुटुंबीयांनी अशा पावत्या गिरणी कामगारांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. तरी संबधित गिरणी कामगारांनी भाई चव्हाण (९४२२३८१९९३) यांच्याशी संपर्क साधावा.
—-+—–+—–+—–+—–+—-
ता. क. :- गिरणी कामगारांच्या या लढ्यात प्रसार माध्यमांनी २००९ पासून उचित प्रसिध्दी दिल्याने ही घरे मिळविण्याचा मार्ग सुकर झाला. आमच्या माहिती प्रमाणे जिल्हातील किमान वारसदार ३ पत्रकारांना ७०/८० लाख रुपये किंमतीची घरे अवघ्या १०/११ लाखांत मिळाली आहेत. असो.
उपरोक्त बातमीला उचित स्थान देऊन सहकार्य मिळणारच.