वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गाच्या कामाला सांर्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर बांधकाम खात्याने कामाला केली सुरुवात

मनसे नेते उपरकर व मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता केणी यांची घेतली भेट

सावंतवाडी वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गाच्या कामाला सांर्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर बांधकाम खात्याने कामाला सुरुवात केल्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होतं आहे. यावेळी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी हे मनसेचें यश असल्याचे सांगितले.

बांदा दोडामार्ग तसेच आंबोली बेळगाव राज्य मार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम झाले होते. त्यामुळे हे दोन्ही मार्ग वाहतुकीस धोकादायक बनले होते. याप्रशनी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर व मनसे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री केणी यांची भेट घेऊन तातडीने यां मार्गाचे काम हाती घेण्याची मागणी केली होती. तसेचं मनसेच्या वतीने माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी डबे वाजवा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर बांधकाम विभागाचे अभियंता श्री केणी यांनी यात लक्ष घालून दीड महिन्यात यां कामास सुरुवात करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर चर्चेअंती मनसेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते उपरकर व मनसे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कार्यकारी अभियंता केणी यांची पुन्हा भेट घेतली. यावेळी बेळगाव वेंगुर्ला रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे तसेच बांदा दोडामार्ग रस्ताचें काम येत्या दोन दिवसात सुरू होणार तर आरोदां वेंगुर्ला रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मनसेने छेडलेल्या डबे वाजवा आंदोलनाचे हे यश असल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली. तर तात्काळ काम हाती घेतल्याबद्दल कार्यकारी अभियंता श्री केणी यांचे आभार मानले. तसेच सदर रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत व ग्रामस्थांनीही सदर कामांकडे लक्ष ठेवून दर्जेदार काम करून घ्यावे असे असे आव्हान मनसेच्यावतीने करण्यात येत आहे.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक नंदू परब ग्रा.प सदस्य अक्षय पारसेकर प्रणित तळकर संतोष सावंत विशाल बर्डे दादा पालकर चेतन पारसेकर खेमराज सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!