जेएसडब्ल्यू चे नकली पत्रे साठ्याप्रकरणी वागदेतील दुकानदारावर गुन्हा दाखल

कंपनी च्या नावे बनावट पत्र्यांची केली जात होती विक्री
जेएसडब्ल्यू कलर ऑन व जेएसडब्ल्यू प्रगती या ब्रँडचे नकली पत्रे विकण्याचा साठा केल्या प्रकरणी वागदे मधील दुकानदार रोहित विष्णू शेट्ये (वय 31 राहणार कणकवली करूळ) याच्यावर प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 नुसार चे कलम 51 व 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ई आय पी आर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला जेएसडब्ल्यू कंपनीने तपासणीचे अधिकार दिल्यानुसार त्यांचे अधिकारी सागर आबनवे, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित आरोपीने वागदे गणेश मंदिर समोरील सुदेश आपारमेंट मध्ये गाळ्यात गोडाऊन करून त्या मध्ये जेएसडब्ल्यू नावाचे नकली पत्र्याचा साठा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईत 1 लाख 36 हजार रुपये किमतीचे पत्रे जप्त करण्यात आले. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली





