राजीनाम्या बाबत आमदार वैभव नाईक यांनी मांडली भूमिका

नारायण राणेंच्या पोटात होतं ते ओठांमध्ये आलं

आमदार वैभव नाईक यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. असे सांगत कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या राजीनाम्या बाबत भूमिका स्पष्ट केली. कणकवलीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज मराठा समाजातर्फे कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व आरक्षणाकरिता आहुती दिलेल्या मराठा तरुणांना श्रद्धांजली साठी समाज बांधव एकवटले होते. याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवत जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. याकरता समाजाच्या आमदार, खासदारांवर दबाव वाढत असून राज्यात अनेक मराठा समाजाच्या आमदार खासदारांनी राजीनामे दिले. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आमदार म्हणून राजीनाम्या बाबत तुमची भूमिका काय? असा सवाल आमदार वैभव नाईक यांना केला असता त्यांनी आम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून त्यांना उघडपणे समर्थन दिले आहे. जरांगे पाटील व आंदोलन करणाऱ्या वर ज्यावेळी लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केले व त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच मराठा आरक्षण या विषयावर विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी आम्ही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली केली आहे. त्यासोबत लोकसभेचे देखील विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी आम्ही केली आहे. मराठा समाजाच्या व जरांगे पाटील यांच्या भूमिकेसाठी जे जे करावे लागेल ते आमदार म्हणून आम्ही करू अशी भूमिका आमदार वैभव नाईक यांनी मांडली. नारायण राणे व त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मराठा समाजाचा वापर हा आपल्या स्वार्थासाठी केला. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका मांडत मराठ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. सत्तेत आल्यावर राणेंच्या पोटात होतं ते ओठावर आलं असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची भूमिका ऍड. सुहास सावंत यांनी स्पष्ट केली आहे. व त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे व सिंधुदुर्गातील मराठा बांधव हा सुहास सावंत यांनी मांडलेल्या भूमिकेशी सहमत आहे असेही श्री. नाईक यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!