तळवडे अर्बन बँकेवर अखेर स्वर्गीय प्रकाश परब समर्पित सहकार वैभव पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

सावंतवाडी प्रतिनिधि .तळवडे अर्बन बँकेवर अखेर स्वर्गीय प्रकाश परब समर्पित सहकार वैभव पॅनलचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले. तळवडे येथील स्व प्रकाश परब यांच्यामार्फत स्थापन झालेल्या तळवडे अर्बन को-ऑप सोसायटीची प्रथमच निवडणूक लागली होती.या निवडणुकीला सहकार वैभव पॅनलचे दहा उमेदवार रिंगणात होते. तर विरोधी उमेदवार राजन रेडकर हे होते. यामध्ये स्वर्गीय प्रकाश परब यांच्या पत्नी उमा प्रकाश परब ,शामल शामसुंदर रेडकर, सगुण खेमा जाधव, हे बिनविरोध निवडून आले होते. तर रघुनाथ श्रीधर गावडे रवींद्र कृष्णा काजरेकर, वसंत गुंडू पडते, नारायण साबाजी परब ,शरद सदाशिव परब ,विलास काशिनाथ परब ,सुभाष जिवाजी रेडकर हे निवडणूक रीगणात होतें, हे सर्व विजयी झाले आहेत.या सर्व विजयी उमेदवारांचे प्रकाश परब मित्र मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याकरता स्व. प्रकाश परब मित्र मंडळच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली