डाॅ. विजय लाड श्री सुंदर मठ शिवथरघळ समितीवर

वैभववाडी- समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक आणि दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक डाॅ. विजय लाड यांची दासबोध ग्रंथाची जननी असलेल्या श्री सुंदरमठ शिवथरघळ सेवा समितीवर विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
नुकत्याच झालेल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सातारा येथील बैठकीत कार्यवाह योगेश बुवा पुरोहित यांनी दत्ताजी चव्हाण, निरा (अध्यक्ष), शरद गांगल, महाड (कार्यवाह), आशिष पाठक, पुणे (खजिनदार) तर विश्वस्त म्हणून डाॅ. विजय लाड (नांदेड) कमलेश जोशी (बिरवाडी), शशी महाजन (गुहागर) यांची नियुक्ती केली आहे.
ऐहिक व पारमार्थिक जीवनाचा सुमधुर समन्वय घडविणारा अद्भूत व अलौकिक दासबोध ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी जावळीच्या खोर्यातील निबीड अरण्यात पण पवित्र व रम्य शिवथर घळीत सांगितला, तो कल्याणस्वामींनी लिहून घेतला.
दासबोध ग्रंथाचे जन्मस्थान असलेल्या व स्वतः रामदास स्वामींनी नाव दिलेल्या सुंदर मठाच्या समितीवर विश्वस्त म्हणून कार्य करण्याची संधी डाॅ. लाड यांच्या निमित्ताने मराठवाड्याला प्रथमच मिळाली आहे. त्यांच्या या निवडीचे कौतूक समर्थ संप्रदायात होत आहे.





