नांदगाव तिठा येथे अवैध दारु विक्री बंद करा,अन्यथा १९ ऑक्टोंबरला धरणे आंदोलन

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन
पोलिसांची केवळ दिखाऊपणाची कारवाई नको
नांदगाव तिठा येथे अनधिकृतपने बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री उघडपणे केली जात आहे.कारवाईची मागणी करुनही ठोस कार्यवाही झाली नाही.त्यामुळेच पुन्हा नांदगाव येथे राजरोसपणे दारू विक्री केली जात आहे. काही दिवसापूर्वी यांचेवर पोलिसांनी फक्त कारवाईचा देखावा उभा केला परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही ,असे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर यांनी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले आहे.कायमस्वरूपी अनाधिकृत दारु विक्री बंद न झाल्यास १९ ऑक्टोंबरला कणकवली पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,नांदगाव येथील ब्रीज खाली उभा असताना तुम्ही आमच्या दारू विक्री विरोधात आवाज उठवता का? आमचा विरोध सोडा,नाहीतर तुम्हाला पण आम्ही रस्त्यावर आणू अशी धमकी मला दारू विक्री करणारे एका व्यक्तीने.तसेच त्याचा भाऊ यांनी आपला राजकीय दबाव आणत शिवसेना उपविभाग प्रमुख तात्या निकम ,मज्जित बटवाले यांना आपण काय असेल तो विषय बसून मिटवून टाकूया,असे फोन करून सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला व आमचे उपनेते गौरीशंकर खोत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना पण हे प्रकरण मिटवून टाका, असे फोन केले.
तसेच हनुमंत म्हसकर व अरुण बापर्डेकर यांना सदर केस मागे घेतली नाही, तर तुमचे पण दुकान बाजारातून उडवून लावीन, मी व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष आहे व माझ्या खूप वरपर्यंत ओळखी आहेत,अशी धमकी दिली आहे.
नांदगाव तिठा येथे अवैध दारु विक्री स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बिनबोभाट चालू आहे ,त्याविरुद्ध २२ ऑगस्टला पोलिसांना अर्ज दिला.मात्र कारवाई झाली नाही. त्यानंतर शिवसेना नांदगाव शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर व इतर मिळून २ वेळा सबधिताने बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री पकडुन दिली. तरीही पोलिसांनी ठोस कार्यवाही केली नाही, तरी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यानी ठोस कारवाई बंद न केल्यास १९ ऑक्टोंबर रोजी कणकवली पोलीस स्टेशन येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे धरणे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे निवेदनात शिवसेना शाखा प्रमुख हनुमंत उर्फ राजा म्हसकर यांनी म्हटले आहे.
कणकवली प्रतिनिधी





