“थाळी कष्टकऱ्यांची” उपक्रमाला पहिल्याच दिवशी तुडूंब प्रतिसाद

समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे कणकवलीत आयोजन
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचा शुभारंभ
मोफत थाळीकरिता अनेक कष्टकऱ्यांची झुंबड
“थाळी कष्टकऱ्यांची” ‘पंगत आपलेपणाची’ या टॅगलाईन खाली कणकवली समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कणकवली थाळी च्या आजच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या वतीने आज मोफत थाळी देण्यात आली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी दुपारी याकरिता अनेक कष्टकऱ्यांनी लांबच लांब रांग लावली होती. माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डाळ, भात, पुरी, उसळ, लोणचे असे पदार्थ या थाळीमध्ये देण्यात आले असून, पुढील पाच दिवसाचे बुकिंग झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी दिली. यावेळी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राजू गवाणकर, रवींद्र गायकवाड, आसिफ नाईक, संजय कामतेकर, किशोर राणे, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, दिलीप वर्णे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, जावेद शेख, महेश सावंत, राज नलावडे आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली





