भिरवंडे मधील दोन विकास कामांना मंजुरी

आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा पाठपुरावा
कणकवली मतदारसंघांचे आमदार नितेश राणे व माजी जि प अध्यक्ष संदेश गोट्या सावंत यांच्या विशेष प्रयत्नाने
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभाग मार्फत “गावांतर्गत मूलभूत सुविधाच्या कामासाठी निधी ” (25/15)या योजनेतून भिरवंडे गावातील दोन विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यामध्ये
1) जांभूळ भाटले ते खडशी नदी साकवा पर्यंत जाणाऱ्या पायावटेवर मोरी बांधणे रक्कम 2.50. ( अडीच लाख )
2) भिरवंडे खालची जांभूळ भाटले वाडी येथे गणेश घाट बांधणे रक्कम 2.50.(अडीच लाख ) या दोन्ही कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून दोन्ही कामे मंजूर केल्या बद्धल आम नितेश राणे व माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांचे भिरवंडे वासियांनी आभार मानले आहेत.
कणकवली, प्रतिनिधी