राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचा वाढदिवस होणार विविध उपक्रमांनी साजरा

सायंकाळी निवासस्थानी होणार अभिष्टचिंतन सोहळा
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या 18 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात शहरातील शाळा नंबर पाच मधील 65 मुलांना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. तसेच या मुलांना जेवण व खाऊ वाटपही करण्यात येणार आहे. तर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.
वाढदिवसानिमित्त च्या सामाजिक उपक्रमामध्ये असलदे दिविजा वृद्धाश्रमासाठी जीवनावश्य वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तर दुपारी पटवर्धन चौक येथे कणकवलीची थाळीचे दोनशे जणांना वाटप करण्यात येणार आहे.
तर सायंकाळी ७.३० वाजता अबिद नाईक यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी