भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांना केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

सावंतवाडी – सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक कुडाळयेथे संपन्न झाली .यावेळी नुतन जिल्हा पदाधिकारयांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली .
या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायणराव राणे , सिंधुदुर्ग पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर , कोकण विभाग संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,आमदार नितेश राणे , सावंतवाडी विधानसभा निवडणुक प्रमुख व माजी आमदार राजन तेली , महीला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व इतर मान्यवर नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती .
या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/प्रकोष्ट/आघाडी/जिल्हाध्यक्ष/संयोजक, मंडल अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते .
बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी केले .





