ठाकरे गटाकडून प्रश्नांचा भडिमार, नितेश राणेंवर जोरदार टीका!

कणकवलीत होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न मध्ये अनेक मुद्याना घातला हात
फसव्या योजना, आमदारांची खोटी आश्वासने जनते पर्यत पोहचवा
शिवसेना ठाकरे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न, करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड, 18, 20, 24 तास काम करून स्वयंघोषित चौकीदार काय करीत होता असे प्रश्न विचारत ठाकरे गटाच्या कॉर्नर सभेत भाजपावर जोरदार घणाघात केला. याच दरम्यान आमदार नितेश राणे यांना विचारलेले प्रश्न पुन्हा विचारात उत्तरे द्या असे आवाहन देण्यात आले. तर आमदारांनी जे बॅनर लावले त्या मुद्द्यांवरून देखील प्रतिसवाल करण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कॉर्नर सभा घेण्यात आली. कणकवली पटवर्धन चौकात आयोजित करण्यात आलेल्या या कॉर्नर सभेच्या वेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, या अभियानाचे निरीक्षक गुरुनाथ खोत, समनव्यक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत जानवी सावंत, कणकवली मतदारसंघ संपर्क प्रमुख अतुल रावराणे, तालुका प्रमुख शैलेश भोगले शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर,राजू राठोड, वैदेही गुडेकर, संदीप कदम, राजू रावराणे, आदी उपस्थित होते . यावेळी भालचंद्र दळवी, संदीप कदम, जान्हवी सावंत, नीलम सावंत, सतीश सावंत, अतुल रावराणे, वैभव नाईक, संदेश पारकर, प्रदीप बोरकर, गुरुनाथ खोत आदींनी मार्गदर्शन केले.
दिगंबर वालावलकर/ कणकवली