फोंडा हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदी सेवाजेष्ठ शिक्षक अजितकुमार देठे यांना डावलल्याने कास्ट्राईब शिक्षक संघटनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेवुन भुमिका केली स्पष्ट

कणकवली : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्मा सुभाष चौगुले यांची त्यांच्या दालणात भेट घेतली .यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यउपाध्यक्ष समाजभुषण मा. संदिप कदम, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर, जिल्हा सरचिटणीस अभिजीत जाधव, जिल्हाउपाध्यक्ष किशोर यादव, कास्ट्राईब आरोग्य संघटना जिल्हाध्यक्ष संजय जाधव सल्लागार अजितकुमार देठे, शेषकुमार नाईक, सहसचिव नचिकेत पवार ,
कनिष्ठ प्रशासन अधिकारी घोगळे,
इत्यादी उपस्थित होते.
सदर भेटी मध्ये प्रामुख्याने अजितकुमार देठे यांना न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट येथे सुरुवातीला अडीज वर्षे पर्यवेक्षक पदापासुन वंचित ठेवुन आता मुख्याध्यापक पदापासुन मागासवर्गिय प्रवर्गातले असल्यानेच डावलले जात आहे . अजितकुमार देठे यांना हेतुपुरस्कर डावलले जात आहे . यापुर्वी तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी सुनावणी घेवुन सेवाज्येष्ठतेप्रमाणे पर्यवेक्षक पद देण्याचा निर्णय दिलेला आहे .तरिही त्यांना सेवाजेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद दिलेले नाही . तरि देठे सर यांना सेवा जेष्ठतेप्रमाणे मुख्याध्यापक पद द्यावे अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने केली असता संबधित शाळेला आणि संस्थेला लेखी पत्र देणेबाबत तसेच कोणत्याही प्रकारचा अन्याय देठे सरांवर होणार नाही या बाबत शिक्षणाधिकारी यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासित केले .
अनुकंपा तत्वावर नचिकेत पवार यांना भंडारी हायस्कूल, मालवण येथे नियुक्ती देणेस संस्था टाळाटाळ करत आहे या पूर्वी माध्यमिक शिक्षण विभातुन नचिकेत पवार यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे बाबत संस्थेस कळविले आहे संस्थेत रिक्त पद असतानाही नचिकेत पवार यांना डावलले जात आहे . नचिकेत पवार यांच्या अनुकंपा तत्वावर नियुक्ती बाबत संस्था चालढकल करत आहे सदर बाबतीत कास्ट्राईब शिक्षक संघटनेने प्रत्यक्ष शिक्षण सचिव देओल साहेब यांची भेट घेवुण निवेदन दिलेले आहे . सदर बाबतीत शिक्षणाधिकारी यांनी संबधित संस्था आणि प्रशालेला लेखी पत्र काढत असल्याचे सांगितले .
तसेच शेषकुमार नाईक यांना कुडाळ हायस्कूल मध्ये पर्यवेक्षक पदाची मान्यता तात्काळ देणेत येईल असे सांगण्यात आले .
कनेडी हायस्कूल येथे सचिन कानडे यांना अनुकंपा तत्वावर त्रुटींची पुर्तता केल्यावर मान्यता देणे बाबत सांगण्यात आले .
तसेच वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. संजय नाईक यांना कायम मान्यता देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येवुन लवकरात लवकर मुख्याध्यापक मान्यता देईल असे सांगण्यात आले .
यावेळी श्री. अभिजीत जाधव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .





