‘स्नेहगंध’ला कोमसापचा विशेष कथा पुरस्कार

    महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारे वाङमयीन आणि वाङमयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार नुकतेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ग्रंथ निवड व पुरस्कार समितीचे प्रमुख प्रा. अशोक रामचंद्र ठाकूर यांनी जाहीर केले. यामध्ये माणगांवच्या लेखिका स्नेहल माळकर-फणसळकर यांच्या 'स्नेहगंध' या कथासंग्रहाला 'विशेष कथा पुरस्कार' जाहीर झाला असून यासाठी त्यांचे सर्व थरातून विशेष अभिनंदन होत आहे. स्नेहल माळकर-फणसळकर या 'ऐलमा पैलमा अक्षरदेवा ' या सिंधुदुर्गातील महिला साहित्य समूहाच्या सदस्य आहेत. तसेच त्या कोमसापच्या कुडाळ तालुक्याच्या उपाध्यक्ष असून

त्यांची ‘स्नेहगंध’ व ‘मुक्त संवाद’ अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
२०२१-२२ मधील सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांचे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर,केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डाॕ.प्रदीप ढवळ,विश्वस्त प्रमुख श्री.रमेश कीर, रेखा नार्वेकर,अरूण नेरूरकर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!