माड्याचीवाडी विद्यालयात सर्पमित्र कार्यशाळा संपन्न


वन्यजीव साप्ताह निमित्त माड्याची वाडी विद्यालयात सर्प मित्र कार्य शाळा आयोजित करण्यात आली होती.सर्पमित्र श्री अनिल गावडे व सहकारी श्री शुभम फाटक यांनी माड्याचीवाडी विद्यालयात वन्य जीव सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेतली. यावेळी श्री. अनिल गावडे यांनी सापांच्या विषारी, निमविषारी व बिनविषारी सापाविषयी माहिती दिली.सापाविषयी असलेले गैरसमज कोणते हे विद्यार्थांना समजावून सांगितले तसेच आपला मित्र कसा हे पण समजावून सांगितले. सिंधुदुर्गात आढळनाऱ्या वेगवेगळ्या ३३ सापांच्या जातीविषयी विद्यार्थांना माहिती दिली. विद्यार्थांच्या मनात सापाविषयी असलेली भीती कमी केली व सापांचे आपल्या जीवनातील महत्व समजावून दिले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रावण बी.एस.व सर्व प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

error: Content is protected !!