जगाला बापुंकडेच परतावे लागेल

डॉ. संजीव लिंगवत यांचे प्रतिपादन
"मानवतेला जेव्हा शांततामय सहजीवनाची खरीखुरी आस लागेल, तेव्हा बापूंकडेच परत यावे लागणार आहे. मात्र, स्वच्छ भारत मोहिमेसाठी बापूंचा आदर्श समोर ठेवलाच पाहिजे आणि या मोहिमेचे यश हे बापूंना अभिप्रेत असणारीच भारताची वाटचाल आहे, यात काही शंका नाही.
वैयक्तिक स्वच्छते सोबत उत्तम स्वच्छतेने भारतातील गावे आदर्श बनवता येऊ शकतात हे सर्वसामान्य जनतेला पटवून दिले .तर ‘ जय जवान जय किसान ‘ नारा देशात देउन लालबहादूर शास्त्री यांनी देशातील बळीराजा व जवानांना सन्मान प्राप्त करून दिला.”
असे प्रतिपादन करत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा वेर्ले क्र. १ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वैयक्तिक स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका भाग्यश्री राणे, जेष्ठ नागरिक सहदेव राऊळ, लतिकेश मेस्त्री, उपशिक्षिका अनिशा गवस, प्रमिला राऊळ, अनंत राऊळ, प्रकाश घाडी, समिधा राऊळ उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला डॉ. लिंगवत यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी वेदांत राणे,धीरज राऊळ,पियुष राऊळ, सारदा बिड्ये, अभिराज राऊळ, श्रावणी घोगळे,वेदीका राऊळ, सृष्टी राऊळ, प्रांजल राऊळ, मयुरी मेस्त्री, जागृती राऊळ व रमणी लिंगवत यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका भाग्यश्री राणे यांनी केले तर आभारप्रदर्शन शिक्षिका अमिशा गवस यांनी केले.
कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
वेंगुर्ले (प्रतिनिधी)