“संस्कार भारती कलाकार तंत्रज्ञ् स्नेहमिलन” सावंतवाडी त संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा कलेच्या क्षेत्रात हिरे माणकांनी भरलेला आहे. अनेक श्रेष्ठ कलाकार ह्या भूमीने भारताला आजतागायत दिले. हा कलेचा वारसा तसेच भारताचे संस्कार कलेच्या माध्यमातून सर्वदूर पसरवण्याचे महान कार्य “संस्कार भारती” च्या अखिल भारतीय संघटने तर्फे “सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण प्रांत” ही नवीन शाखा ह्यापुढे करणार आहे.
” संस्कार भारती” च्या सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री मा. सौ. अनिताताई चव्हाण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी कळसुळकर इंग्लिश हायस्कूल मध्ये “कलाकार व तंत्रज्ञ् ह्यांचा स्नेहमिलन सोहळा” कलाकारांच्या प्रचंड उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून ध्येयगीत,गुरु वंदना व गणेश वंदनेने यथासांग झाली. दरवाज्या समोर संस्कार भारतीच्या सुंदर, रंगीत रांगोळी ने श्री. सागर आईर ह्यांच्या टीम ने स्वागत केले.
सोहळ्या साठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा. ना. दिपकभाई केसरकर आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी कलाकारांना पाठिंबा दिला.
मा. संजय जी गोडसे हे संस्कार भारती कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य, श्री दीपक कदम हे संस्कार भारती कोकण प्रांत चित्रपट आयाम सह संयोजक आणि सुरेन्द्र कुळकर्णी हे संस्कार भारती कोकण प्रांत मंत्री – जनजाती कला ह्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
ह्या स्नेहमिलनात जिल्ह्याची कार्यकारिणी समिती स्थापन करण्यात आली. कुडाळस्थित ख्यातनाम वकील मा. श्री. महेशजी कुंटे ह्यांची अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली तसेच सावंतवाडीच्या मा. सौ. प्रतिमाताई सुकी ह्यांची कोषाध्यक्ष पदी नेमणूक झाली. सह-महामंत्री पद श्री. नित्यानंदजी परब ह्यांना सुपूर्त करण्यात आले.
सोहळ्यात “संस्कार भारती” च्या कार्याची थोडक्यात माहिती आलेल्या मान्यवर कोकण प्रांतमंत्र्यांनी अचूक करून दिली.
श्री. संजयजी गोडसे ह्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देताना संस्थेचा इतिहास सांगून योग्य मार्गदर्शन केले तर श्री.सुरेंद्रजी कुलकर्णी ह्यांनी संस्थेचा सम्पूर्ण आढावा घेऊन कार्यकारिणी समिती पुढे कशी चालवायची ह्यासाठी मार्गदर्शन केले. चित्रपट क्षेत्रात डायरेक्टर म्हणून नावलौकिक मिळवलेले श्री. दिपकजी कदम हयांनी जिल्ह्यातील कलाकारांना सर्वतोपारी मदत करण्याचे आश्वासन दिले.
ह्या प्रसंगी सौ. अनिताताईनी केलेल्या प्रस्तावनेत सर्व मान्यवरांना व स्थानिक जनतेला कलाकारांना कायम स्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन केंद्रित असल्याने, पर्यटकांना कलेचा अविरत आस्वाद कधीही घेता येईल व कलाकारांना रोजगार संधी उपलब्ध होतील असा ह्या मागील उद्देश आहे.
सोहळ्यात संस्कार भारतीच्या विविध शाखांच्या एकूण 7 विधा स्थापन करण्यात आल्या व संयोजकांची नेमणूक करण्यात आली. ज्यात नृत्य- सौ. स्नेहा नाईक , नाट्य- श्री. श्यामसुंदर नाडकर्णी , लोककला – श्री. श्रीकृष्ण गोरे, संगीत – श्री. संकेत म्हापणकर, चित्रकला – श्री. साईश वाडकर , साहित्य- सौ. संप्रवी कशाळीकर , भू-अलंकरण- श्री सागर आईर , ह्यांना सोपवण्यात आली.
सावंतवाडी (प्रतिनिधी)