शिक्षक भरती करताना बिंदुनामावली प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गाचा अनुशेषाच्या सर्व जागा भराव्यात – संदीप कदम

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची वतीने शिक्षण आयुक्त यांना निवेदन देवुन अनुसुचित जातीच्य अनुशेषासहित बिंदू नामावली प्रमाणे सर्व शिक्षक पदाच्या रिक्त जागा भराव्यात अशी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांनी निवेदना द्वारे शिक्षक आयुक्त पूणे यांच्या कडे मागणी केली आहे . गतवेळी 2017 मध्ये शिक्षक भरती करताना अनुसूचित जातीच्या (SC) प्रवर्गावर अन्याय झाला आहे . सदवेळी शिक्षकभरती च्या कपात धोरणामुळे अनुसुचित जातीच्या 50% जागा न भरल्यामुळे अनुसुचित जाती प्रवर्गावर अन्याय झालेला आहे. तरि आता 2023 च्या शिक्षक भरतीत अनुशेष आणि बिंदूनामावलीनुसार महाराष्ट्र भरातील सर्व अनुसूचित जातीच्या रिक्त जागा भराव्यात. अनुसुचित जाती प्रवर्गावर अन्याय होणार नाही याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी . असे निवेदनात म्हटले आहे .तरिही अनुसुचित जाती प्रवर्गावर अन्याय झाल्यास कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि अनुसुचित जाती शिक्षक बेरोजगार संघटना , महाराष्ट्र सदर बाबतीत आंदोलनात्मक भुमिका घेईल आणि वेळप्रसंगी अन्याया विरोधात न्यायालयात न्याय मागेल असे निवेदन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक आयुक्त पूणे यांना देण्यात आले आहे .
कणकवली (प्रतिनिधी)