जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं 3 शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं 3 शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.पाककला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपटण मा. सौ. वडाम मॅडम, व मा. सौ. कुलकर्णी मॅडम यांनी परीक्षण केले.देणगीदार मा.श्री. डॉ.विलास डहाणू हे मुंबई येथील प्रसिद्ध डॉक्टर असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मुलांची शैक्षणिक गरज ओळखून मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी लॅपटॉप देण्याचे मान्य केले होते. त्याची पूर्तता यावेळी करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. माजी वित्त व बांधकाम सभापती मा. श्री. बाळासाहेब जठार यांनी महिलांनीही सक्षम होण्यासाठी त्यांना अशा स्पर्धामध्ये सहभागाची गरज असते असे उपक्रम घेऊन गावातील महिलांना सक्षमीकरण करण्यास मदत होईल असे ते म्हणाले. मार्गदर्शन करताना पूर्वीच्या काळातील आणि आताच्या काळातील फरक समजावून देताना ते म्हणाले पूर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मुलं यातच गुंतून राहावं लागत असे परंतु आता सरकारने त्यांना पुढे येण्यास मदत केली आहे अशा प्रकारच्या उपक्रमात महिलांनी सहभागी व्हावे. असे बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी साळिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. गोपाळ जाधव साहेबांनी हि या कार्यक्रमास उपस्थित राहून गावातील महिलांनाही अशा स्पर्धेत भाग घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी तसेच सर्व शिक्षकांचे हि कौतुक केले. याप्रसंगी माजी वित्त व बांधकाम सभापती मा.श्री बाळासाहेब जठार, वारगाव गावच्या सरपंच मा. सौ. नम्रता शेटये मॅडम, तसेच उपसरपंच मा.श्री.नानासाहेब शेटये व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री. किशोर मांडवकर , माजी उपसरपंच मा. श्री. इरफान मुल्ला साहेब तंटामुक्त अध्यक्ष मा. श्री. राजेश जाधव केंद्रप्रमुख मा.श्री. गोपाळ जाधव तसेच वारगाव गावचे सर्व पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सत्यवान शिवाजी केसरकर सर यांनी केले. मा.सौ. अर्चना अमोल तळगावकर मॅडम, मा.सौ. वंशिका विनायक महाडेश्वर मॅडम, मा. श्री. रविंद्र लोकरे सर उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण