कलमठ गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी महेश लाड

सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले अभिनंदन
कलमठ गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सदस्य महेश लाड यांची निवड करण्यात आली आहे. कलमठ ग्रामपंचायत ची ग्रामसभा आज सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रावीअ प्रवीण कुडतरकर, गुरुनाथ वर्देकर, दिनेश गोठनकर, स्वाती नारकर, अनुप वारंग, श्रेयस चिंदरकर, सुप्रिया मेस्त्री, नितीन पवार, पपू यादव,मिलिंद चिंदरकर, बाबू नारकर, स्वरूप कोरगावकर, आबा कोरगावकर, अशोक नाईक, मुख्याध्यापक श्रीकांत बुचडे उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी