सरकार विरोधातील मराठा समाजाच्या मोर्चाला कणकवलीत मोठा प्रतिसाद
आमदार वैभव नाईक यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधव उतरले रस्त्यावर
समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी
मराठा समाजावर झालेल्या जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी कणकवलीत मराठा समाज बांधवांकडून कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या प्रारंभि छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कणकवली पटवर्धन चौक मार्गे मोर्चा प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चात आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पडते, ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते संदेश पारकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चा सहभागी झाले होते. यावेळी डीवायएसपी संध्या गावडे यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी मोर्चामध्ये भगव्या टोप्या व एक मराठा लाख मराठा च्या टोप्या परिधान केलेल्या मराठा समाज बांधवांमुळे या निषेध मोर्चाची धार अजूनच वाढली होती. यात मोर्चेकर्यांनी या लाठी सरकार तर करायचं काय खाली डोकं वर पाय, लाठी चार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो, या सह अन्य गगनभेदी घोषणा दिल्या. या मोर्चामध्ये युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा गावडे, सुशांत दळवी, समीर परब, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर, अनुप वारंग, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तात्या निकम, शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, राजू राठोड, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, सचिन आचरेकर, राजू रावराणे, सोमा गायकवाड, अजय सावंत, प्रशांत राणे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, माधवी दळवी, संतोष परब, मंगेश सावंत, अनुराग सावंत, जानवी सावंत, रुची राऊत, मंदार सावंत, धनंजय सावंत, विलास गुडेकर, निसार शेख, रामदास विखाळे, राजू शेट्ये, त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडण्यात आला.
दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग