सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत ; अन्यथा आंदोलन

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या बैठकीत निर्णय आचरा–अर्जुन बापर्डेकर सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याची एकत्रित बैठक सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिकांना संघाच्या इमारतीच्या सभागृहात प्रकाश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेत सेवानिवृत्त ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध…

वीज वितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता….

नितीन वाळकेंचा आरोप; प्रकाशगडला नोटीस बजावण्याचा, स्वतंत्र संचालकांना भेटण्याचा निर्णय मालवण, महावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाने महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना बजावलेली जाहीर नोटीस न स्वीकारल्ल्याने ती माघारी आली आहे. यावरून अधीक्षक अभियंता…

डोंबिवली एमआयडीसीत अग्नि तांडव ; कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेले मंत्री रवींद्र चव्हाण थेट डोंबिवलीला रवाना

मालवण, डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा आगडोब उसळला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा औद्योगिक वसाहतीतील दुसऱ्या एका कंपनीला आग लागली आहे. यापूर्वीच्या जखमा ताज्या असतानाच दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच राज्याचे सर्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे तातडीने डोंबिवलीला…

पर्यटन स्वागत केंद्रांच्या इमारतीचे नूतनीकरण केल्याशिवाय त्याची निविदा प्रक्रिया करू नये

बबन साळगावकर; शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी… सावंतवाडी येथील पालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या पर्यटन स्वागत केंद्रांच्या इमारतीचे नूतनीकरण केल्याशिवाय त्याची निविदा प्रक्रिया करू नये, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तब्बल ३…

सिंधुदुर्गात १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी परिक्षा.

पोलीस अधीक्षकांची माहिती; १४२ पदांसाठी ८ हजार ४२ अर्ज… सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ जागांसाठी ८ हजार ४२ अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेतील मैदानी परीक्षा १९ जून पासून पोलीस दलाच्या सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर होणार आहे,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

सिंधुदुर्गनगरी, राज्य शासनाने आज पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४४७ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. राज्य शासनाने पदोन्नतीने पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या…

सिंगल युज प्लास्टिक पिशव्या वापर प्रकरणी कणकवली नगरपंचायत कडून 26 हजारांचा दंड

आठवडा बाजारा दिवशी नगरपंचायतची धडक कारवाई कणकवली नगरपंचायत च्या वतीने आज मंगळवार आठवडा बाजारा दिवशी अचानक सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कारवाई करत तब्बल 26 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. गेले काही दिवस मंगळवार आठवडा बाजारा दिवशी मुख्याधिकारी पारितोष कंकाळ…

कलमठ मधील चंद्रकांत मेस्त्री यांचे निधन

भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांना पितृशोक कणकवली तालुक्यातील कलमठ – सुतारवाडी येथील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कणकवली कार्यालयातील कर्मचारी चंद्रकांत बाळकृष्ण मेस्त्री (वय 62) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने…

चोडणेकर कुटुंबीयांची आमदार नाईक यांनी घेतली भेट…

तळाशील येथील होडी दुर्घटना ; कुटुंबाचे केले सांत्वन… मालवण, तळाशील येथे खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी होडी उलटल्याने पाण्यात बुडून झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या मच्छीमाराचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक…

संतप्त शेतकरी बांधव,भगिनींचा भर बांधावरती, भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश

वेंगुर्ला : गेली आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नेते…

error: Content is protected !!