खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

​शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रवाह, उपक्रम आणि प्रशासकीय कामकाज यांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खारेपाटण व शेर्पे केंद्रस्तरीय संयुक्त शिक्षण परिषदेचे आयोजन आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराट येथे करण्यात आले. या परिषदेत दोन्ही केंद्रांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध…

वात्सल्य ट्रस्ट मुंबई चे संचालक मा. श्री. विद्याधर साठे यांची श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा- नर्सिंग कॉलेज, खारेपाटण ला सदिच्छा भेट

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा- नर्सिंग कॉलेज येथे मुंबई येथील वात्सल्य ट्रस्ट चे संचालक श्री.विद्याधर साठे, प्रतिनिधी माधवी मुंडे, आणि मानसी मिठबावकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. खारेपाटण पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक…

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांची जयंती उत्साहात साजरी

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण, येथे गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर व त्यांच्या पत्नी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी श्रीकृष्ण पाटणकर यांच्या हस्ते गुरुवर्य…

ग्रामीण महिला बहुउद्देशीय संस्था, सिंधुदुर्ग च्या जिल्हा समन्वयक रूपाली कदम यांचे सोशल मीडिया व आजची तरुणाई या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, स्नॅपचॅट, एक्स (ट्विटर) अशा विविध माध्यमांमुळे तरुणांचे विचार, वर्तन आणि जीवनशैली यावर मोठा प्रभाव पडतो. याचे होणारे दुष्परिणाम आजच्या तरुणाई ला समजून सांगण्याच्या उद्देशाने…

पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यातून दुसरा धक्का

वरवडे पंचायत समिती मधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध ठाकरे गटाच्या सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांची माघार कणकवली तालुक्यात बिनविरोध निवडीचा धमाका भाजपाकडून सातत्याने सुरू असून, बिडवाडी पंचायत समितीमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आज वरवडे पंचायत समितीमध्ये भाजपाचे…

जि. प., प.स. निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातून 91 अर्ज वैध

६ अर्ज ठरले अवैध; जि. प. साठी ३५ तर पं. स.साठी ५६ उमेदवार रिंगणात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातून एकूण 97 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . त्यातील 6 अर्ज अवैध झाल्याने 91 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदसाठीचे…

खून प्रकरणातील आरोपी कुणाल कुंभारचा जामीन अर्ज फेटाळला

कुडाळ : तालुक्यातील घावनळे येथील अल्पवयीन मुलीच्या खुन प्रकरणातील आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याचा नियमीत जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी फेटाळला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ तालुक्यात…

खारेपाटण-तळेरे महायुती मधील जि. प आणि पं. स. उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ संपन्न

खारेपाटण केदारेश्वर मंदिर व कालभैरव मंदिर येथे श्रीफळ ठेवून उमेदवारांनी घेतला आशीर्वाद शिवसेना उपनेते संजय आंग्रे, दिलीप तळेकर, मंगेश गुरव यांची उपस्थिती महायुतीतील जि. प साठी – प्राची इस्वलकर, पं. स. साठी – गुरुप्रसाद शिंदे व राजेश जाधव आहेत निवडणूक…

कणकवलीत एक दिवस छोट्यांचा, धम्माल, मस्ती उद्या

खाऊ गल्ली सह, किलबिल जल्लोष व लहानग्यांसाठी अनेक मनोरंजनाचे उपक्रम समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने एक दिवस छोट्यांसाठी, खाऊगल्ली व किलबिल जल्लोष या लक्षवेधी उपक्रमाचे आयोजन उद्या 24 जानेवारी रोजी…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या “जन्मशताब्दी जयंती” निमित्त कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेबांना मानवंदना

माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले अभिवादन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या “जन्मशताब्दी जयंती” निमित्त कणकवली शिवसेना शाखेत मानवनंदना अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक,…

error: Content is protected !!