कुडाळ शहरात इलेक्ट्रिक दुचाकी चोरी

चोरटा CCTV मध्ये कैद

कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात इमारतीखाली पार्क केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोमाकी X1’ ही पांढऱ्या रंगाची इलेक्ट्रिक दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी करण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास संधी साधून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. सकाळी दुचाकी जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर मालकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हुडी परिधान करून आणि चेहऱ्यावर मास्क लावलेला चोरटा दुचाकी घेऊन जाताना कैद झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
कुडाळ शहरातील मध्यवर्ती परिसरात दुचाकी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!