वाघेरी येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाला तृतीय क्रमांकाचा मान

कुडाळ येथे आंतरराज्य चक्री वारकरी भजन स्पर्धा

कुडाळ येथील मारुती मंदिर मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धेत कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाने उल्लेखनीय भजन सादरीकरण करून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
भजन सम्राट चंद्रकांत गुरव यांच्या नेतृत्वाखाली या आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वाघेरीने सहभाग घेतला होता. या मंडळाला या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला असून उत्कृष्ट वेशभूषेसाठीही प्रथम क्रमांक देवून गौरविण्यात आले आहे.
भजन सम्राट चंद्रकांत गुरव हे चाळीस वर्षाहून अधिक काळ वारकरी तसेच संगीत भजन सेवा सहकाऱ्यांसह करत आहेत. त्यांनी भजन क्षेत्रात अनेक शिष्य घडविले आहेत. डबलबारी भजन क्षेत्रातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.अनेक भजन स्पर्धेत सहभागी होवून त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत.त्यांच्या तसेच मंडळाच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!