कुडाळ येथे १५ ऑगस्टला चेम्बर ऑफ कॉमर्सच्या नव्या कार्यालयाचे उ‌द्घाटन

कोकणच्या औ‌द्योगिक विकासाला नवी दिशा

नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि भव्य उ‌द्योजक परिसंवाद

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) या महाराष्ट्रातील उ‌द्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील अग्रगण्य आणि राज्य शासनमान्य सर्वोच्च उ‌द्योग संघटनेच्या वतीने दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ येथे दोन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती चेम्बर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी दिली. कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. १५ ऑगस्ट ला चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभागाच्या कार्यालयाच आणि इन्क्युबेशन सेंटरचे उदघाटन आणि १६ ऑगस्टला हॉटेल आराध्य येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि भव्य उ‌द्योजक परिसंवाद होणार आहे.
या पत्रकार परिषदेला कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, गव्हर्नर कौन्सिल मेम्बर ऍड. नकुल पार्सेकर, विजय केनवडेकर, कुणाल वरसकर, राजन नाईक, मनोज वालावलकर, गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबा टोपले उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नितेश राणे, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, प्रमोद जठार तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष यांची विशेष उपस्थिती या सर्व कार्यक्रमास लाभणार आहे.
सन १९२७ मध्ये शेठ वालचंद हिराचंद यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेली MACCIA ही संस्था पुढील वर्षी आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असून, गेल्या ९९ वर्षांपासून महाराष्ट्रातील उ‌द्योग, व्यापार, कृषी, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि उ‌द्योजकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे. राज्यभरातील हजारो उ‌द्योजक, व्यापारी आणि शेकडो व्यापारी-औ‌द्योगिक संघटनांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणारी MACCIA ही महाराष्ट्राच्या औ‌द्योगिक विकासातील एक प्रभावी संस्था म्हणून ओळखली जाते.
या कार्यक्रमांतर्गत MACCIA च्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, २०२६-२०२८ कार्यकाळातील नूतन व्यवस्थापन समिती, कार्यकारिणी व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांचा सत्कार, तसेच ‘उ‌द्योजक परिसंवाद’ आयोजित करण्यात आला आहे.
परिसंवादामध्ये उ‌द्योग, व्यापार, कृषी, पर्यटन, एमएसएमई, स्टार्टअप्स, निर्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कौशल्य विकास, गुंतवणूक, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. राज्यातील नामवंत उ‌द्योगपती, वरिष्ठ शासकीय अधिकारी, बँकिंग व वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी आणि यशस्वी उ‌द्योजक या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
MACCIA चे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातील उ‌द्योगपती, व्यापारी, उ‌द्योजक, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला उ‌द्योजिका, युवा उ‌द्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोकणातील उ‌द्योग, व्यापार, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी व कृषी-आधारित उ‌द्योगांना चालना देणे, स्थानिक उ‌द्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणे, नवउ‌द्योजकांना योग्य मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
MACCIA च्या शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर आयोजित हा कार्यक्रम कोकण विभागाच्या औ‌द्योगिक विकासासाठी नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) तर्फे सर्व उ‌द्योजक, व्यापारी, व्यावसायिक, स्टार्टअप्स, वि‌द्यार्थी आणि उ‌द्योग क्षेत्रात रुची असलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!