सातपाटी फिश पोर्टमुळे मच्छीमारांना मिळणार दिलासा

सातपाटी फिश पोर्ट विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सातपाटी बंदर विकासाला गती

पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर असलेल्या सातपाटी येथील फिश पोर्ट विकास कामाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गणेशजी नाईक यांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
सातपाटी खाडीच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मासेमारी तसेच बोटींच्या वाहतुकीदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत सातपाटी फिश पोर्टच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे बंदरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होऊन स्थानिक मच्छीमारांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच मत्स्य व्यवसायाला चालना मिळून मच्छीमारांच्या आर्थिक जीवनमानात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास पालघरचे खासदार हेमंतजी सवरा, आमदार मनीषाताई चौधरी, आमदार राजन नाईक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!