घोणसरीत भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार प्रसाद राणे विजयी

तळेरेत सांगर डंबे , दारिस्तेत पुजा गुरव विजयी

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कणकवली तालुक्यात भाजपाचा बोलबाला

ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकी अंतर्गत कणकवली तालुक्यातील तळेरे व दारिस्ते ग्रामपंचायतीच्या एका सदस्य पदासाठी तर घोणसरी येथे सरपंच पदाचा निकाल बुधवारी तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. घोणसरीत भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार प्रसाद राणे विजयी झाले. तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी तळेरेत सांगर डंबे , दारिस्तेत पुजा गुरव विजयी झाले आहेत. तालुक्यातील पोटनिवडणूकीतही भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा विजय झाला आहे.
कणकवली तहसिलदार यांच्या दालनात ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरु करण्यात आली. या मतमोजणीच्या निमित्ताने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोणसरी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी प्रसाद राणे यांना 517 मते , अनंत गुरव यांना 410 मते , नोटा 10 मते अशी एकूण 937 मतदान झाले. त्यामुळे प्रसाद राणे यांचा 107 मतांनी विजय झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशिकांत भरसर यांनी काम पाहिले.
तळेरे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सागर डंबे यांना 312 मते , आदीत्य महाडीक यांना 83 मते , नोटा 6 मते मिळून 401 मतदान झाले होते. या निवडणूकीत भाजपचे सागर डंबे यांचा 229एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला. तळेरे येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय पवार यांनी काम पाहिले. दारिस्ते येथे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पुजा गुरव यांना 170 मते , प्रिती कदम यांना 53 मते , नोटा 1 मत एकूण 224 मतदान झाले. त्यामुळे भाजप पुरस्कृत पुजा गुरव यांचा 117 मताधिक्यांनी विजय झाला आहे. दारिस्ते येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ओंकार सुतार यांनी काम पाहिले.
कणकवली तहसिल कार्यालय येथे सकाळी घोणसरी , दारिस्ते , तळेरे या ठिकाणचे पोटनिवडणूकीचे निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला . यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो … खा. नारायण राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…. पालकमंत्री नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…. अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा उत्साह दिसून येत होता.

error: Content is protected !!