श्री गांगोरामेश्वर पुर्वा देवी मंदिर हरीनाम सप्ताहास उत्साहात सुरुवात

हरीनामाचा गजर करत सोमवारी सकाळी दहा वाजता घटस्थापना करुन मानकरी, देवस्थान समिती आणि ग्रामस्थ मिळून मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्यानंतर श्री गांगोरामेश्वर पुर्वा देवी मंदिर हरीनाम सप्ताहास उत्साहात सुरुवात झाली.सकाळ पासूनच माहेरवाशीणी,ग्रामस्थ ओठ्या भरणे दर्शनासाठी गर्दी केली होती. पोयरे राणेवाडीने पहिला पार सुरु केला. त्यानंतर बागवाडी,गोंदापूर,घाडीवाडी,गावठणवाडी,गादववाडी-मश्वी वाडी या क्रमाने पार सुरु झाले.
सोमवारी सकाळी पोयरे गावात सात प्रहराचा हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. .याकरीता गावकरी देवस्थान कमिटी आणि संपूर्ण गाव मिळून कार्यक्रम साजरा केला जातो. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण मंदिर परीसर आकर्षक विद्यूत रोषणाई ने सजला आहे.मंदिर परीसरात विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांची मांडणी विक्रेत्यांनी केली आहे.

error: Content is protected !!