कणकवलीत कचऱ्याचे ढीग पसरल्याने नागरिकांना त्रास

भर बाजारपेठेतही कचरा उचलला न गेल्याने नाराजी
मुख्याधिकारी गौरी पाटील लक्ष देणार का? जनतेचा सवाल
सलग दोन दिवस असलेल्या सुट्ट्यांमुळे कणकवलीत कचऱ्यांचे ढीग पसरले असून कणकवलीतील कचरा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. कणकवली नगरपंचायत कडून याबाबत कोणतीही उपाय योजना अद्याप पर्यंत झालेली नाही. दरम्यान कणकवलीत अनेकदा जागोजागी कचऱ्याचे ढीग सापडत असून भटके कुत्रे व भटक्या गुरांमुळे हा कचरा अस्ताव्यस्त पसरत असतो. कणकवली बाजारपेठेमध्ये महापुरुष कॉम्प्लेक्स जवळ सध्या असलेला कचऱ्याचा ढीग हा तेथील रहिवाशांसह व्यापाऱ्यांना व जनतेला त्रासदायक ठरत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करत कचरा उचलला जावा अशी मागणी शहरवासीयांमधून केली जात आहे.