ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये बाल दिन साजरा.
कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रशालेतील मुलांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले. यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
इयत्ता 12 वी ची विद्यार्थिनी कु.सारा खान हिने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला आयडियलच्या इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम, को.ऑर्डीनेटर श्री.निलेश घेवारी सर, श्री.हेमंत पाटकर सर,सौ.राधिका कुडाळकर मॅडम,ऋषिका वर्दम मॅडम,सौ.आरुषी पालव मॅडम आणि विद्यार्थी उपस्थित होते.मान्यवरांनी मुलांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.