कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदोन्नती , जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी 13 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया समोर राज्यभर धरणे आंदोलन

महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम यांची माहिती
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची सभा शासकीय विश्रामगृह कणकवली येथे महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदरवेळी महासंघाचे राज्याचे महासचिव सुरेश तांबे उपस्थित होते . सदरवेळी
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वा खाली 13 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले . सदरवेळी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या धरणे आंदोलना बाबत माहिती दिली .1)भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीसह इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती सरळसेवा भरतीमध्ये दिलेल्या सवलतीस अनूसरुन मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय व मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी करणे बाबत देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिव यांना केंद्रसरकारने परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.अनुसूचित जाती /अनुसूचित जमातीसह मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती रोखता येणार नाही असे स्पष्ट निर्देश देऊनही, राज्यातील महायुती सरकारने अद्यापही मागासवर्गीयांच्या पदोन्नती बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे सर्वच मागास प्रवर्गातील कर्मच्यार्यावर महाराष्ट्र शासन अन्याय करत आहे . सदर सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार इतर राज्यात पदोन्नती देण्यात आलेली आहे .
2) मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची अनुशेष भरती तात्काळ करणे
3)2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तात्काळ लागू करणेबाबत
4 ) राज्यातील सर्व सफाई कामगारांच्या वेतन संरचना सुरक्षेबाबत धोरणात्मक निर्णय घेणे बाबत
5 )राज्यातील कंत्राटी धोरण रद्द करण्याबाबत
वरिल विषयांच्या अनुषंगाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे सांगितले . तदवेळी जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी कास्ट्राईब संघटना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्का साठी लढत असल्याचे सांगितले . कास्ट्राईब संघटनेच्या शासन स्तरावर खातेनिहाय सहविचार सभा घेतल्या जातात . त्याचे इतिवृत्त मिळते असे सांगितले . सर्वानी एकजुटीने कास्ट्राईब संघटना बळकट करूया असे सांगुण धरणे आंदोलना बाबतही मार्गदर्शन केले . सदरवेळी कास्ट्राईब महासंघाचे महासचिव किशोर कदम , माध्यमिक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर , महासचिव अभिजित जाधव ,प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर , महासचिव मनोजकुमार अटक आरोग्य संघटना उपाध्यक्ष महेंद्र कदम ,महासचिव दिपक कांबळे ,ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर , जिल्हामहा सचिव प्रशांत जाधव , माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र तांबे ,वाहनचालक संघटना जिल्हाध्यक्ष संजय कदम , सफाई कामगार संघटना जिल्हाध्यक्ष अविनाश तांबे , माजी जिल्हाध्यक्ष विनायक हरकुळकर , सुरेंद्र यादव ,सतिश तांबे ,बिपिन ठाकुर संदीप नागभिडकर ,अजितकुमार देठे , मुख्याध्यापक किशोर यादव , नचिकेत पवार ,अनिल चव्हाण ,अमित ठाकुर ,विद्यानंद शिरगांवकर ,सुनिल जाधव , आरोग्य संघटना सुनिल धामणकर , दयानंद तांबे ,कास्ट्राईब कायदेविषयक सल्लागार ॲड बाजीराव कांबळे ,ॲड सुदीप कांबळे तसेच
सर्व युनिटचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार अभिजित जाधव यांनी व्यक्त केले .
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी