मळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने आयोजान

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सावंतवाडी : हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे.
यनिमित्त सकाळी ५.०० वाजता यशवंत गड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मळगावपर्यंत मशाल रॅली, सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळा, दुपारी २ ते ४ या वेळेत संपूर्ण गावात मोटरसायकल रॅली व होळकर घर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ढोल ताशा पथक, सायंकाळी ४ ते ५ वाजता महिला हळदी कुंकू, फुगड्या, पैठणी व संगीत खुर्ची खेळ, सायंकाळी ५ ते ६ वाजता लेझीम नृत्य, वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथी गट विषय – १) स्वातंत्र्याची प्रेरणा शिवस्वराज्य, २) राजमाता जिजाऊचे संस्कार, ३) माझे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पाचवी ते आठवी गट विषय – १) किल्ले संवर्धन करणे काळाची गरज, २) शिवजयंती कशी साजरी करायची, ३) स्वराज्याचा शिलेदार, खुला गट-१) छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती, २) कथा आणि व्यथा श्रीमान रायगडाची, ३) छत्रपती शिवाजी महाराज आणि आताचे राजकर्ते असे विषय ठेवण्यात आले आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी ६ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ०६ ते ७ वाजता मर्दानी खेळ व बक्षीस समारंभ, सायंकाळी ०७ वाजता स्नेहभोजन त्यानंतर रात्री ०९ वाजता विश्वकला मंच कलानिमित्त कलाविष्कार, नृत्य, हास्य, विनोदांचा खास आकर्षण आदी.कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी आपली नावे पांडुरंग राऊळ- ९९६७३३३१००/९६१९२०२६८७, सचिन राऊळ- ८८९८९०९१००, दिपेश राऊळ-९११२१११९८९, निलेश ठाकूर-९४०४७४८४९३, रितेश राऊळ-८७८८८७६१७३ व आनंदी फोटो स्टुडिओ-९७६३४८८५६० यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. मळगाव येथील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!