स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य. अर्थात छत्रपतींचे राज्य हे प्रत्येकाला स्वतःचे राज्य वाटत होते स्वराज्य वाटत होते. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सरकार हे स्वतःचे सरकार अस प्रत्येकाला वाटत आहे याच भावनेतून स्वराज्य सप्ताहाचे आयोजन केले आहे. या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली निबंध व चित्रकला स्पर्धा ही विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी व त्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत स्वराज्य संकल्पना पोहोचावी हा उद्देश आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.
स्वराज्य सप्ताहनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कणकवलीच्यावतीने विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,
शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय विजयकुमार वळंजू,
विद्यामंदिर मुख्याध्यापक पी. जे.
कांबळे, पर्यवेक्षिका सौ.व्ही व्ही .
जाधव ,राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडूलकर ,जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक,शहर उपाध्यक्ष अमित केतकर, प्रांतीक सदस्य विलास गावकर , दिलीप वर्णे ,शहर चिटणीस गणेश चौगुले, बाळू मेस्त्री जिल्हा प्रतिनिधी सचिन अडुळकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत
श्री. वणवे, श्री. सिंगनाथ, श्री.जे.जे.शेळके , श्री तवटे,सौ. शिरकर, श्री. गावकर, श्री प्रसाद राणे, सौ.पी.पी.सावंत उपस्थित होते . स्पर्धेमध्ये विद्यामंदिरच्या सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी अबिद नाईक पुढे म्हणाले,
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने जनसामान्यांच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. शासनाने शेती व त्या अनुषंगाने पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मधाचे गाव सारखी योजना ही आणली आहे रस्ते विकासाच्या बाबतीत शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय ही या जिल्ह्यात आणण्यात आले आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई राज्यात माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येणार आहे. फळ पिक विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.
असे अनेक लोकाभिमुख निर्णय या सरकारने घेतले. सर्वसामान्य जनतेला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आपले सरकार वाटते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सर्वच आघाड्यांवर नंबर एकचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे सरकार अनेक लोकाभिमुख निर्णय घेत असून हे निर्णय म्हणजेच स्वराज्याच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करून विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमांना आपणा सर्वांचे मिळालेली साथ निश्चितच कौतुकास्पद असून आपण यापुढे अशीच साथ द्या.असे अबिद नाईक म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे सचिव विजयकुमार वळंजू म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिताना किंवा चित्र रेखाटताना छत्रपतींचा शिक्षणाविषयीच्या दृष्टिकोन, शेती विषयक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार पोहोचण्याचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे श्री.वळंजू म्हणाले.
यावेळी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या उपक्रमाचे कौतुक करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट केला .सूत्रसंचालन
श्री. सिंगनाथ यांनी केले तर आभार विलास गांवकर यांनी मानले.
कणकवली प्रतिनिधी





