संजय घोडावत विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण दर्शनाने साजरा करण्यात आला.ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थी प्राध्यापकांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की भारताचे संविधान माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य देते, हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर सर्वांनी एकोप्याने राहणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर वाळींबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,की विद्यार्थ्यांनी नेहमी नाविन्याचा ध्यास घ्यायला हवा. स्वयंशिस्तीसाठी विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा प्रयत्न करावा. केवळ सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करता येते असे नाही तर एक उत्तम नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये पार पाडली तर ती देशसेवाच ठरते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, की घोडावत विद्यापीठ विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर राहण्यास सर्वतोपरी मदत करत असते. संजय घोडावत यांनी या शिक्षण संकुलाचे मोठे स्वप्न पाहिले आहे याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होत आहे सध्या पुणे येथे इंटरनॅशनल स्कूल सुरू होत आहे तसेच विद्यापीठात कायद्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी पदवी आणि पदव्युत्तर लॉ कॉलेज सुरू होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. तेही कार्य हाती घेताना सकारात्मक वृत्ती अंगीकारल्यास आपल्याला यश नक्कीच मिळते.
यावेळी घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.इंटरनॅशनल स्कूल व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नृत्य नाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.याप्रसंगी स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती,आयआयटी व मेडिकल अकॅडमी चे संचालक वासू सर,सर्व विद्यार्थी, शिक्षक,प्राध्यापक उपस्थित होते. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!