अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा

मसूरे – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती आणि प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि . ३० / ० १ / २०२४ रोजी सकाळी ११. वा . जि . प . पूर्ण प्राथ. शाळा वेर्ले नं . १ ता. मालवण येथे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या विषयांतर्गत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत . या व्याख्यानाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती जि प पूर्ण प्राथमिक शाळा वेर्लेचे अध्यक्ष सचिव यांनी केले आहे . तर दुपारी ३ वा . आर . पी . डि बागवे हायस्कूल मसुरे ता . मालवण येथे व्याखान आयोजित केले आहे . तरी या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अँड. राजीव बिले यांनी केले आहे .