विश्वनाथ घुगे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषद – नगरपंचायत कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुखपदी तर सुभाष मालपाणी यांची उद्योग व व्यापार सेल राज्यप्रमुखपदी आणि गौतम खरात यांची महानगर पालिका कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुख पदी नियुक्ती…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने विश्वनाथ घुगे यांची नगर परिषद – नगरपंचायत कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुख पदी तर सुभाष मालपाणी यांची उद्योग व व्यापार सेल राज्यप्रमुखपदी आणि गौतम खरात यांची महानगर पालिका कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुखपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली.

नगरपंचायत, महानगरपालिका आणि व्यापार व उद्योग क्षेत्रात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी विश्वनाथ घुगे, सुभाष मालपाणी, गौतम खरात यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांना पुढील वाटचालीसाठी अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!