भंडारी समाजामार्फत मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर याचा करण्यात आला सत्कार

सावंतवाडी भंडारी समाजाची लढवय्या समाज म्हणून ओळख आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा अशीही ओळख आहे. सावंतवाडी भंडारी मंडळाची सुसज्ज वास्तू ही समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे. एकता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सुसंस्कृत युवा पिढी घडविण्यासाठी वाचन चळवळ महत्वाची आहे. यासाठी भंडारी समाज मंडळाने वाचनालय सुरू करावे. यासाठी माझ्याकडून भरीव स्वरूपात पुस्तके देण्यात येतील. इतर उपक्रमा बरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व कायमस्वरूपी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू करा व सदर केंद्र सर्व समाजासाठी खुली ठेवा, असे आवाहन मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी येथे केले

error: Content is protected !!