कणकवलीच्या तत्कालीन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांकडून सत्कार

प्रांताधिकारी पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल केले समाधान व्यक्त कणकवलीच्या प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत असणाऱ्या वैशाली राजमाने यांची सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी…

कणकवलीचे नवनिर्वाचित प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे भाजपकडून स्वागत

जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी केले अभिनंदन कणकवली चे प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारल्या नंतर आज कणकवलीचे माजी सभापती व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, दत्ता काटे,…

रेडी येथील द्विभूज गणपतीचा आज वाढदिवस

सिंधुदूर्ग जिल्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी नागोळेवाडी येथिल प्रसिध्द व्दीभुजा गणपतीचा ४७ वा वाढदिवस सोहळा आज विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.त्यानिमित्त सकाळी ५ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता श्री सत्यविनायक महापुजा, दुपारी १.३० वाजता महाआरती, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत…

वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा तर्फे विकास कामांचा झंझावात

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते चार विकासकामांची भूमीपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात विवीध विकासकामे मंजूर झाली . ह्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात…

कणकवलीतील बोरकर सर यांचे निधन

आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी व कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक अरविंद दत्तात्रय बोरकर (वय 75) यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पक्षात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज…

अखेर मृत बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अडीच लाखांचा निधी अदा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा विशेष पाठपुरावा हायवे ठेकेदार कंपनीच्या पोलचा शॉक लागून बाळकृष्ण तावडे यांचा झाला होता मृत्यू हायवे ठेकेदार कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे विद्युत पोलाचा शॉक लागून मृत्यू झालेल्या बाळकृष्ण तावडे यांच्या…

बाबासाहेबांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नका

आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानात कवयित्री प्रमिता तांबे यांचे आवाहन कणकवली/मयुर ठाकूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती सोहळा हरकुळ बुद्रुक येथे विविध कार्यक्रमातून साजरा झाला. यावेळी कवयित्री तांबे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर विकास मंचाचे…

कणकवली शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

गड नदीपात्र सुकल्याने प्रशासनाचा निर्णय शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात यायला अजून दोन दिवस जाणार कणकवली शहरालगतचे गडनदीपात्रात खडखडाट असल्‍याने शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्‍याची माहिती आज नगरपंचायत प्रशासनाने दिली. दरम्‍यान शिवडाव धरणातील पाणी शुक्रवारी सोडण्यात आले आहे. हे…

भात खरेदीचा जमा झालेला बोनस शेतकऱ्यांनी दलालांना देऊ नये!

कणकवली तालुका शिवसेनेचे तालुक्यातील भात विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत वेधले कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष कणकवली तालुक्यातील भात शेतकऱ्यांना मिळणारा बोनस काही ठिकाणी दलालांच्या घशात जात असल्याची बाब समोर आल्याने याबाबत शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी व्ही. वाय.…

*शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २० एप्रिल पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह

८ व्या वर्धापन दिनानिमित्त २० ते २७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली तालुक्यातील शिरवल, टेंबवाडी, येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. २०एप्रिल २०२३ ते गुरुवार, दि. २७ एप्रिल २०२३ या कालावधीत श्री ग्रंथराज…

error: Content is protected !!