डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान नवभारता साठी देणगी – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली /मयुर ठाकूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते आज जगात ज्ञानाचे प्रतीक म्हणून डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला जातो तो सार्थ ठरतो. डॉ.
बाबासाहेब हे अद्भुत प्रतिभा आणि बुद्धिमत्तेचे धनी होते. त्यांचे कार्य राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मोलाचे आहे त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले संविधान, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने दिलेले अधिकार हे नवभारतासाठी अमूल्य देणगी आहे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी केले.
याप्रसंगी त्यांनी त्यांचे आजोबा बॅ. सावंत साहेब आणि डॉ. आंबेडकर यांच्या मितृत्वाचा उल्लेख करीत घरोब्याच्या संबंधांना उजाळा दिला.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सांस्कृतीक विभागाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित कार्यक्रमात डॉ. राजश्री साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. संदीप साळुंखे, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा.सौ.सुषमा हरकुळकर, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे उपस्थित होते.
यावेळी प्रा.सुषमा हरकुळकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेतला. डॉ. संदीप साळुंखे यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “आजच्या काळात सामाजिक परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतातील प्रत्येकाने आचरणात आणणे पाहिजेत.”
प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगी यांनी याप्रसंगी उपस्थितितांना आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.’ वर्तमान काळात बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे’ असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारुती चव्हाण यांनी केले. प्रस्ताविक प्रा.सौ.दीपा तेंडुलकर यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक सचिन दर्पे यांनी केले.