“भारताचा भविष्यकाळ घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आवश्यक” – नितेश राणेकणकवलीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानातून राष्ट्रप्रेमाचा संदेश
भारताच्या भविष्यासाठी संस्कृती आणि अध्यात्म महत्त्वाचे – नितेश राणे
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय नारायण राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विवेक विचारमंच सिंधुदुर्ग संवाद परिवार, तळेरे यांच्या वतीने प्रहार भवन, कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी लाभली असे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ व्याख्याते आणि लेखक श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी “भारताचा भविष्यकाळ आणि आपण” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यान केले. भारतीय संस्कृतीचा जागतिक संदेश, राष्ट्रप्रेम, पर्यावरण, अध्यात्म तसेच देशासमोरील विविध आव्हानांवर त्यांनी थेट आणि प्रभावी भाष्य केले.
आजच्या तरुण पिढीने राष्ट्रहित, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी यांचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार समाजाला नवी ऊर्जा आणि योग्य दिशा देणारे आहेत. अशा व्याख्यानमालेमुळे समाजात सकारात्मक विचारांची जागृती होण्यास निश्चितच मदत होते.
यावेळी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





