शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
कणकवली मध्यवर्ती शिवसेना शाखेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर व उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, जिल्हाप्रमुख सोशल मीडिया महेश तेली, जिल्हा खजिनदार भास्कर राणे,शहर प्रमुख बाळू पारकर, महिला शहर प्रमुख प्रिया टेमकर ,सुनील पारकर, राजन म्हाडगुत ,मारुती सावंत, दिलीप घाडीगावकर, दिलीप राऊत, प्रदीप तळगावकर ,विठोबा सावंत, प्रमोद सांगवेकर ,सुनील जंगले, इत्यादी शिवसैनिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली





