विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलला दुहेरी यश

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने आणि १७ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विभागिय स्पर्धेसाठी पाट हायस्कुलचे एकूण चार संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते. त्यातील १४ वर्षे मुलगे व १७ वर्षे मुलगे या संघाने अटीतटीच्या सेमी फायनलच्या सामन्यात हार पत्करून तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यासाठी १४ वर्षे मुलाच्या संघाने सातारा संघावर मात करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यासाठी रत्नागिरी संघावर मात करून तृतीय क्रमांक प्राप्त केवळ. 14 वर्षे मुली व 17 वर्षे मुली हे दोन्ही संघ विभाग स्तरावर सहभाग होते. वरील दोन्हीं तृतीय क्रमांक प्राप्त संघाला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
१४ वर्षे मुलगे या संघात गगनेश सारंग मयूर आडारकर, पृथ्वीराज पवार, हिमांशू रेडकर, भार्गव पेडणेकर, वेदांत शृंगारे, हर्ष प्रभू, रघुनाथ सारंग, चित्रांक प्रभू, कृष्णा पाटकर, रुचीत चव्हाण, विनीत राऊळ या खेळाडूंनी चांगले कामगिरी केली. १७ वर्षे मुले या संघात मांगल्य मेतर, यश आरोलकर, ऋग्वेद परब, निखिल राठुळ, श्रेयश घाडी, विराज देसाई, बाळकृष्ण रावले, मिहीर मेस्त्री, सुयश पाटकर, पृथ्वी भगत, आदेश पडते, आर्यन खोबरेकर या खेळाडूंनी चांगला खेळ केला.
१४ वर्षे मुली संघात सार्थकी फणसेकर, तनवी दाभोलकर, लावण्या पराडकर, आर्या प्रभू, आर्या ठाकूर, शांती मुंडीये, धार्मिक गोसावी, आरोही पाटकर, खुशी कोचरेकर, आदिती घाडी, निधी चव्हाण, हे खेळाडू संघात सहभागी होते . १७ वर्षे मुलींच्या संघात गायत्री चीपकर, धनदा सावंत, श्रेया सागवेकर, वैभवी केळुसकर, वेदिका गोसावी, लावण्या मेस्त्री, शिवानी सर्वेकर, सिया मयेकर, चिन्मयी सक्रे, कोमल कुडव हे खेळाडू सहभागी होते.
या चारही संघातील खेळाडूस प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, क्रीडा शिक्षक संजय पवार, दादू कुबल, राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर, चारुहास वेंगुर्लेकर, पालक ग्रामस्थ आजी-माजी खेळाडू यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंचे संस्था अध्यक्ष डी ए सामंत, चेअरमन देवदत्त साळगावकर, संस्था सचिव विजय ठाकूर, संचालक अवधूत रेगे, राजेश सामंत, सुधीर मळेकर, दीपक पाटकर, महेश ठाकूर, पर्यवेक्षक श्री बोंदर सर, प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!