नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांना पितृशोक

   नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांचे वडील भगवान तुकाराम कोलते यांचे आज शुक्रवार दि.६ जून रोजी सकाळी ९:०० वा. नवीन कुर्ली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले ते ९३ वर्षांचे होते. 
        त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नवीन कुर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना वारकरी संप्रदायाची खूप आवड होती. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोलते कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
error: Content is protected !!