मळेवाड येथील प्रवचन भंडारा उत्सव संपन्न

श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचनास भाविकांची गर्दी
सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम पार पडला. सकाळी श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचन संसारात राहून उत्तमरित्या परमार्थ कसा साधावा व नाम साधनेने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याबद्दलचा सरळ आणि सोपा मार्ग परम संताच्या वाणीतून ऐकायला मिळाला. त्यानंतर सद्गुरू दर्शन, महाप्रसाद झाला. तसेच भजन भक्तीगीताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सावंतवाडी तसेच जिल्ह्याभरातून अनेक भाविकांनी प्रवचन व भडांरा उत्सवाचा लाभ घेतला. या सर्व भाविकांचे ज्ञान कर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, सावंतवाडी




