दोन्ही मुलगे मंत्री झाले तर माझ्यासारखा भाग्यवान वडील मीच!
खासदार नारायण राणे यांचे मतदानानंतर उद्गार
वरवडे येथे मूळ गावी केले मतदान
कणकवली मतदारसंघातून नितेश राणे व कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे मोठे मताधिक्याने विजयी होतील. असा दावा करत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दोन्ही मुलगे मंत्री झाले तर यासारखा भाग्यवान वडील मीच असेन असे उद्गार माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले. कणकवली येथील त्यांच्या वरवडे येथील मूळ गावी त्यांनी मतदानाचा कुटुंबीयांसमवेत हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी नीलम राणे, सून प्रियंका राणे, नंदिता राणे, नातू अभिराज राणे व निमिष राणे आदी उपस्थित होते.