रेशन दुकानांवर धान्य वितरणास मुदतवाढ द्या

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांची मागणी

रास्त दराच्या धान्य दुकानांवर सर्व्हर मुळे निर्माण झालेल्या समस्येवर मात करण्यासाठी जुलै महिन्याचे धान्य ऑफलाइन देण्याचे आदेश नुकतेच झाले आहेत. मात्र हे आदेश शेवटच्या तारीखला झालेले असल्याने जुलै महिन्याच्या धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जुलै महिन्यात धान्य वितरण करताना सर्वर समस्येमुळे ग्राहकांना अनेकदा फेऱ्या माराव्या लागल्या. ऑनलाइन धान्य वितरण होण्यास येत असलेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर धान्य वितरण ऑफलाईन करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी 30 जुलै रोजी मान्य करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्याचे धान्य वितरण करण्यास 31 जुलै हा एकमेव दिवस शिल्लक असल्याने जे ग्राहक धान्यापासून वंचित आहेत त्यांना एका दिवसात धान्य वितरण करणे शक्य नाही. त्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वितरण करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सर्वेश दळवी वागदे सरपंच संदीप सावंत,लक्ष्मण सावंत,समीर प्रभू गावकर संदेश सावंत उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!